माझी आवडती गाणी
खूप गाणी अशी असतात जी मनात घर करून बसतात. जातच नाहीत. मग मध्येच कधी अचानक आठवतात आणि डोक्यात घोळत बसतात. या ब्लॉगमध्ये भरपूर गाणी यावीत असा काही माझा अट्टाहास नाहीय किंवा खूप लोकांनी वाचवा यासाठी तर मुळीच लिहलेला नाहीय. बस... माझी काही आवडती मोजकी गाणी...
Monday, October 18, 2010
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है !
पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है !
उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा
संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो
ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो
दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है !
तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है !
जय भवानी, जय शिवाजी !
Tuesday, August 24, 2010
केतकीच्या बनी तिथे
गीत - अशोकजी परांजपे
संगीत - अशोक पत्की
स्वर - सुमन कल्याणपूर
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठावरी भिजला ग, आसावला सूर
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज, भावगीत बोलले
डोळियात पाहिले, कौमुदीत नाहले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला ग, भारावला चकोर
संगीत - अशोक पत्की
स्वर - सुमन कल्याणपूर
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठावरी भिजला ग, आसावला सूर
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज, भावगीत बोलले
डोळियात पाहिले, कौमुदीत नाहले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला ग, भारावला चकोर
Sunday, August 22, 2010
खोडी माझी काढाल
गीत - शांता शेळके
संगीत - मीना खडीकर
स्वर - योगेश खडीकर
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट,
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट !
अंगावरती याल तर असा देइन ठोसा,
कोप-यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा !
बजरंग माझा भाऊ भीम माझा काका,
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका !
दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो,
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भीतो, मग कोण भीतो ?
संगीत - मीना खडीकर
स्वर - योगेश खडीकर
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट,
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट !
अंगावरती याल तर असा देइन ठोसा,
कोप-यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा !
बजरंग माझा भाऊ भीम माझा काका,
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका !
दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो,
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भीतो, मग कोण भीतो ?
Friday, July 30, 2010
मल्हारवारी
गीत - शाहीर साबळे
संगीत - अजय-अतुल
स्वर - शाहीर साबळे, अजय
चित्रपट - अगं बाई, अरेच्चा ! (२००४)
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
संगीत - अजय-अतुल
स्वर - शाहीर साबळे, अजय
चित्रपट - अगं बाई, अरेच्चा ! (२००४)
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
Sunday, July 11, 2010
मन सुद्ध तुझं
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर - मा. परशुराम
चित्रपट - कुंकू (१९३७)
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
संगीत - केशवराव भोळे
स्वर - मा. परशुराम
चित्रपट - कुंकू (१९३७)
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
Saturday, July 10, 2010
श्रीगणेशा
संदीपच्याच गाण्याने सुरुवात करायची ठरवली. तशी त्याची सगळीच गाणी माझी आवडती आहेत, पहिला आणि दुसरा नंबर काढणं कठीण. पण हे गाणं खुप खास आहे, कारण हे गाणं त्याने अगदी मला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्यासारखं वाटतं
---
गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - संदीप खरे
अल्बम - नामंजूर
मी हजार चिंतांनी डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो
मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो
डोळ्यांत माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक, मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पून सा-या
अन् ’धन्यवाद’ देवाचे घेऊन जातो
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो
---
गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - संदीप खरे
अल्बम - नामंजूर
मी हजार चिंतांनी डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो
मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो
डोळ्यांत माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो
मी आस्तिक, मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पून सा-या
अन् ’धन्यवाद’ देवाचे घेऊन जातो
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो
Subscribe to:
Comments (Atom)